जिल्हयातील 25 प्रवासी/सहवासितांचे अहवाल निगेटीव्ह
*जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग सदृस्य लक्षण असणारा एक ही रुग्ण्‍ नाही
लातूर,दि.20:- जिल्हयात आजतागायत कोरोना कोविड-19 आजाराचे एकूण 25 प्रवासी/ सहवासितांचे स्वॅब (Throat Swab) तपासणीसाठी एन.आय.व्ही.पुणे या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी-18 प्रवासी/सहवासतिांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून -7 प्रवासी/सहवासितांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत.  कोरोना या विषाणूचा संसर्ग सदृश्य लक्षणे असणारा एकही रुग्ण्‍ लातूर ‍जिल्हयात आढळून आलेला नाही असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी कळविले आहे.
लातूर जिल्हयात बाहेर देशातून /राज्यातून/ जिल्हयातून आलेले प्रवासी व सहवासित यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.लातूर जिल्हयात जिल्हास्तरावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र बाहरुग्ण्‍ विभाग सुरु करण्यात आलेला आहे.तसेच - 47 खाटांचे विलगीकरण कक्ष (Isolation ward) सुरु करण्यात आलेले असून सदर कक्ष - 24 तास कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत Isolation ward मध्ये करोना बाधित रुग्ण्‍ दाखल झालेला नाही.
कोरोना साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत औषधोपचार व उपाययोजना करण्यात येत असून आरोग्य विभाग सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना/औषधोपचार / रुग्ण्सेवेसाठी - 24 तास तत्पर आहे. तरी नागरिकांनी कोरोना आजारास घाबरुन न जाता आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. काही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या शासकिय रुग्णालयाशी संपर्क साधून वैद्यकिय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हयात कोरोना कोविड - 19 आजाराच्या प्रतिबंधासाठी शासकिय रुग्णालयामध्ये - 14 विलगीकरण (Isolation ward) व खाजगी रुग्णालयामध्ये - 18 विलगीकरण कक्ष (Isolation ward) असे एकूण -  32 विलगीकरण कक्ष (Isolation ward) स्थापन करण्यात आलेलेअसून - 26 Ventilator उपलब्ध्‍ करण्यात आलेले आहेत.
बाहेर देशातून/राज्यातून /जिल्हयातून आलेले प्रवासी व सहवासित यांना Quarantine करण्यासाठी जिल्हयात - 10 ठिकाणी  Quarantine कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत.
महत्वाची सूचना :-कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शंका आली तर घाबरु नका, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, तुम्ही या विषाणूग्रस्त भागात प्रवास केला असेल आणि ताप खोकला आणि श्वास घ्यावयास त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टराचा सल्ला घ्यावा व त्यांच्या सल्याने रुग्णालयात भरती व्हावे. लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या व उपचारासाठी शासकीय रुग्णालयांशी संपर्क करावा,
राष्टीय कॉल सेंटर क्रमांक. 91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र. 020-26127394 व टोल फ्री हेल्पलाईन क्र. 104 असून लातूर जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र.02382-246803 आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा