"कोरोना”चा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आणि सतर्क
*जनतेने दक्षता बाळगावी, अफवांवर विश्वास ठेऊ
नये
-पालकमंत्री अमित देशमुख
लातूर,
दि.12 : कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोतोपरी
प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्रातील आरोग्य यंत्रणाही
सज्ज ठेवण्यात आली असुन जनतेने घाबरुन जाऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे
आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्राचे
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
राज्याचे
मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा
लातूर जिल्ह्राचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश
टोपे व वरिष्ठ अधिकायांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरÏन्सगद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि
आरोग्य क्षेत्रातील अधिकायांशी संपर्क साधुन कोरोना व्हायरसच्या प्रसाराला
प्रतिबंध करण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
यासंदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी
म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरात कोरोनाचे काही
रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील संपुर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली
असून या रोगाचा प्रसार हाऊ नये याची पुर्ण दक्षता घेण्यात येत आहे.
लातूर
जिल्ह्रात अद्याप कोरोनाची लक्षणे असलेला एकही रुग्ण आढळला नसला तरी खबरदारीचा
उपाय म्हणून जिल्हा प्रशासन, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था,
आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका व
नगरपालिकांचे आरोग्य विभाग तसेच आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या इतर संस्था
यांना सक्त सुचना देऊन सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सतर्क राहण्यास सांगीतले
आहे. नागरिकांना कोरोना संदर्भाने माहीती देऊन जागरुक करावे, कोरोनाची लक्षणे दिसत
असलेल्या रुग्णांचा शोध घ्यावा असे संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्यांना स्वतंत्र
विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्यावर काळजीपुर्वक उपचार देण्याच्या सुचनाही देण्यात
आलेल्या आहेत.
कोरोना
आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मिळणारी
परवानगी (व्हिजा) बंद केले आहे. त्याचप्रमाणे ज्या नागरीकांनी कोरोनाग्रस्त
देशातून मागील तीस चाळीस दिवसाआधी प्रवास केला आहे अशा नागरीकांना ताप, खोकला,
श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या
शासकीय / निमशासकीय किंवा मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयाशी तातडीने संपर्क साधणे
आवश्यक आहे. कोरेना व्हायरसची लागण झाल्याची जाणीव झाल्यास किंवा तशी शंका आल्यास
नागरीकांनी स्वत:हुन आवश्यक ती काळजी घ्यावी. आपल्या परिवार व समाजात या व्हायरचा
प्रसार होणर नाही याची काळजी घ्यावी व तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधणे आवश्यक
आहे.
कोरोना
आजार किंवा इतर साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी नागरीकांनी स्वत:ही काही
पथ्य पाळण्याची, काळजी घेण्याची गरज आहे, असे सांगुन शिंकताना किंवा खोकतेवेळी
नागरीकंानी आपल्या तोंडाजवळ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी घराबाहेर
पडताना प्रत्येक नागरीकांनी स्वच्छ हातरुमाल स्वत:जवळ बाळगावा, वारंवार हात स्वच्छ
धुवावेत, आवश्यकता नसल्यास डोळ्यांना व तोंडाला हात लावू नयेत, अनावश्यक प्रवास
टाळावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि कोरोनाच्या संदर्भाने समाजमाध्यमे व ईतर
माध्यमातून येणाया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवण्यास प्रक्रियेत
सहभागी होऊ नये असे आवाहनही राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री
तथा लातूर जिल्ह्राचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment