अकार्यक्षम संस्थांची नोंदणी रद्द होणार
लातूर,दि.13:- धर्मादाय कार्यालय, लातूर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त 3 यांच्या अखत्यारीतील अकार्यक्षम असलेल्या संस्थाची मुंबई सार्वजनिक विश्वस्त  व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 3अ अन्वये नोंदणी रदद करणे बाबत कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
         नोदणी रद्द  करण्यात येणाऱ्या संस्थाची यादी धर्मादाय कार्यालय, दिवाणजी कॉम्पलेक्स, दुसरा मजला,अंबाजोगाई रोड, लातूर येथे कार्यालयीन  नोटिस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच मा. धर्मादाय अयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या www.charity.maharashtra.gob.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
         सदर प्रक्रियेमध्ये संस्था/ न्यास नोंदणी रदद करण्यात येणाऱ्या संस्थाचा नोंदणी क्रमांक एफ-16710 ते एफ 16991 पर्यंतचा आहे. ज्यांनी हिशेाबपत्रके व बदल अर्ज नियमाप्रमाणे दाखल केलेले नाहीत अशा संस्थांचा क्रमांक एफ- 16710 ते एफ - 16991 या दरम्यान आहे. अशा संस्थांची सुनावणीची तारीख दि. 20 एप्रिल 2020 ते दि. 23 एप्रिल 2020 रोजी पर्यंत नेमण्यात आलेली आहे.
        तरी सदरील संसथा/ न्यास यांनी धर्मादाय कार्यालय, लातूर यांच्याशी संपर्क साधुन आपले म्हणने  मुदतीत सादर करावे. अन्यथा सदरच्या संस्था/ न्यास यांची नोंदणी रद्द करण्यात येईल, असे धर्मादाय कार्यालय, लातूर यांनी कळविले आहे.

                                                ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु