जिल्हयातील सर्व पान
शॉप /पान टपऱ्या
31 मार्च पर्यंत
बंद
लातूर,दि.20:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड
19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च
2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी
तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी
लातूर जिल्हयातील तंबाखू व तंबाखूजन्य धूम्रपानाचे पदार्थ इ. ची विक्री करणारी सर्व
दुकाने/ पान शॉप/ पान टपऱ्या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात
आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने दिनांक
31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन
केल्यास संबंधितांवर विरुध्द भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात यावी
सदरहू आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी
दिले आहे.
Comments
Post a Comment