कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत
सर्व शासकीय समारंभ, मेळावे, प्रदर्शन व सभांना प्रतिबंध
लातूर, दि. 15:- जिल्ह्यात नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
होऊ नये या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम30(2) नुसार जिल्ह्यात
गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा समूह एकत्र जमू नये म्हणून जिल्ह्यात 31
मार्च 2020 पर्यंत शासकीय समारंभ, मेळावे, प्रदर्शन, निदर्शने, मोर्चे, सार्वजनिक स्वरूपाचे
धार्मिक कार्यक्रम, यात्रा-जत्रा, सभा, उरूस इत्यादी प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रतिबन्धचे
आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार शासकीय/ निमशासकीय/ खाजगी सर्व संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात
जनसमुदाय एकत्र येतील अशा बैठका, कार्यक्रम, चर्चासत्र, कार्यशाळा, संमेलन, परिषद व
पदवीप्रदान समारंभ इत्यादीचे आयोजन करण्यास प्रतिबंध केलेला आहे. हे आदेश दिनांक
14 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेले आहेत.
केंद्र शासनाने नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी
मोठ्या प्रमाणावर जमाव व गर्दी टाळणे बाबत निर्देश दिले आहेत. तसेच नॉव्हेल कोरोना
विषाणूचा प्रसार हा विषाणूची लागण एक संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस तो त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असते.गर्दीच्या
ठिकाणी कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व
विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक
आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये
यासाठी पूर्वतयारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 30(2) नुसार जिल्ह्यात 31
मार्च 2020 पर्यंत सर्व प्रकारच्या सामुदायिक
कार्यक्रमास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
****
Comments
Post a Comment