प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता मुदत वाढ
      लातूर,दि.17:- महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता इच्छुक संस्थांकडून व्यवस्थापनांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी दि. 1 जानेवारी 2020 ते 28 फेब्रुवारी 2020 असा होता. तो दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे.
        https://vti.dvet.gov.in या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थालयाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरता येईल. मान्यता प्रक्रीया पुर्ण करणे बाबतची माहिती मंडळाच्या माहिती पुस्तीकेमध्ये देण्यात आली आहे. युजर मॅन्युअल (USER MANUAL)व माहिती पुस्तीका मंडळाच्या (www.msbve.gov.in ) या संकेतस्थळावर उपलब्ध्‍  आहे.  परिपूर्ण  अर्जावरच पुढील कार्यवाही करण्यात येईल तसेच संस्थेला सर्व प्रकारच्या शुल्काचा ऑनलाईन भरणा करण्यात येईल.
        अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधावा अथवा मंडळाचे संकेत स्थळ (www.msbve.gov.in ) पहावे, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु