जिल्हयातील 785 ग्रामपंचायतीच्या आरक्षित
सरपंच पदाची 23 मार्च रोजी निवड
लातूर, दि.13:- ग्रामविकास विभागाच्या दिनांक 5 मार्च 2020 पासून पुढील पाच वर्षाकरीता अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनु.जाती,अनु.जमाती आणि नागरिकांचा मागस प्रवर्ग यातील महिलांसह), यांच्यासाठी सरपंचाची पदे जिल्हानिहाय वाटप केली आहेत. सदरील लातूर जिल्हयासाठी वाटप केलेली सरपंचाची 785 पदे लातूर जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आली आहेत.
स्त्रीयांसाठी (अनु.जाती, अनु.जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील स्त्रीयांसह) राखून ठेवावयाची जिल्हयातील सरपंचांची पदे राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार चिठ्ठया टाकून जिल्हाधिकारी यांच्या वतीने नेमून देणेसाठी खालील उपजिल्हाधिकारी यांची त्यांचे पदनामासमोर नमुद केलेल्या तालुक्यांसाठी संपर्क अधिकारी म्हणून याव्दारे नियुक्ती करण्यात येत आहे.
संपर्क अधिकारी यांचे पदनाम, नेमून देण्यात आलेला तालुका, आरक्षण काढण्याचा दिनांक, वेळ पुढील प्रमाणे आहे. उप-विभागीय अधिकारी, लातूर दिनांक 23 मार्च 2020 वेळ सकाळी 10.30 वाजता. उप-विभागीय अधिकारी , औसा-रेणापूर- औसा दिनांक 23 मार्च 2020 वेळ सकाळी 10.30 वाजता, रेणापूर दिनांक 23 मार्च 2020 रोजी दुपारी 3.00 वाजता. उप-विभागीय अधिकारी –निलंगा  निलंगा दिनांक 23 मार्च 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता, शिरुर अनंतपाळ दिनांक 23 मार्च 2020 रोजी दुपारी 3.00 वाजता.देवणी दिनांक 24 मार्च 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता.
उपविभागीय अधिकारी, उदगीर- उदगीर दिनांक 23 मार्च 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता. जळकोट दिनांक 23 मार्च 2020 रोजी दुपारी 3.00 वाजता.उपविभागीय अधिकारी अहमदपूर- अहमदपूर दिनांक 23 मार्च 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता. चाकूर दिनांक 23 मार्च 2020 रोजी दुपारी 3.00 वाजता.
उपरोक्त संपर्क अधिकारी यांनी संबंधित त्यांचे विभागातील तालुक्याचे तहसिलदार यांचेशी समन्वय साधुन सरपंच आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करावी व जिल्हाधिकारी यांचे वतीने महिला आरक्षण काढून त्याबाबतचे इतिवृत्त तात्काळ या कार्यालयास सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु