जिल्ह्यातील ग्रंथप्रेमीनी लातूर ग्रंथोत्सवास भेट द्यावी
                                         - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
*लातूर येथे दोन दिवशीय  " लातुर ग्रंथोत्सवाचे "  आयोजन
* वाचकांना दोन दिवस साहित्याची मेजवानी मिळणार
* ग्रंथोत्सवात पुस्तक विक्रेत्यांचे अनेक स्टॉल येणार

   लातूर, दि. 6:- लातूर ग्रंथोत्सव 2019 अंतर्गत लातूर शहर व जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांना दिनांक 7 व 8 मार्च 2020 या कालावधीत डॉ.  बासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल येथे होणाऱ्या दोन दिवशीय ग्रंथोत्सव अंतर्गत साहित्याची मेजवानी मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त साहित्यप्रेमींनी या ग्रंथोत्सवास भेट देऊन हा ग्रंथोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
     महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय लातुर आयोजीत  शनिवार ( ७  मार्च व रविवार ( ८ मार्च २०२० ) या दोन दिवशी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे लातूर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रंथोत्सवाचे उद्घाटन  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पर्यावरण,पाणीपुरवठा व स्वच्छता , सार्वजनिक बांधकाम,रोहयो, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या ग्रंथोत्सवात परिसंवाद,कविसंमेलन ग्रंथप्रदर्शन,ग्रंथदिंडी आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले आहै .या दोन दिवशीय ग्रंथोत्सवाला जास्तीत जास्त ग्रंथालय कर्मचारी,ग्रंथालयाचे पदाधिकारी व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष जी.श्रीकांत व सचिव सुनील गजभारे यांनी केले आहे.
     ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने जुने जिल्हधिकारी कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क दरम्यान शनिवार, (दि.७ मार्च ) रोजी सकाळी ९ ते १०.३० दरम्यान लक्षवेधी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे, दिंडीचे उद्घाटन लातुरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.फ.म.शहाजिंदे, प्रा.डॉ.सतीष यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी १०.३० वाजता ग्रंथोत्सव स्थळी ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ विक्रीचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ११ वाजता ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते व राज्य मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे, या सत्राच्या अध्यक्षपदी इतिहास संशोधक प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे हे राहणार आहेत, प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे खा.सुधाकर श्रंगारे, व उस्मानाबादचे खा.ओमप्रकाशराजे निंबाळकर,तसेच आ.सतीष चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.सुरेश धस, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.बाबासाहेब पाटील, आ.धीरज देशमुख, आ. अभिमन्यू पवार,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ऍड.ब्रिजमोहन झंवर यांची उपस्थिती राहणार आहे.
     तसेच दुपारी २ ते ४.३० या वेळात दुसरे सत्र समाज प्रसार माध्यमे आणि वाचन या विषयावर ,विभागीय माहिती उपसंचालक  यशंवत भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, या परिसंवादात लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप नणंदकर, साहित्यिक विवेक सौताडेकर, प्रा.डॉ.दत्ता हरी होनराव व दै,मनोगतचे संपादक राजू पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी ४.३० ते ६.३० या  तिसऱ्या सत्रात कवी नरसिंग इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली  कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . त्यात,प्रा.फ.म.शहाजिंदे, विनय अपसिंगेकर, शंकर झुल्पे, जयप्रकाश दगडे, भारत सातपुते,रमेश चिल्ले, विलास सिंदगीकर, डॉ.शिवाजी जवळगेकर, प्रा.राजा होळकुंदे, तृप्ती होळकुंदे, प्रा.ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी, डॉ.मारोती कसाब, संजय घाडगे, इंजि.शैजला कारंडे, प्रा.दर्शन देशमुख, अंकुश शिंदगीकर, प्राचार्य तुकाराम हारगीले,  रामदास कांबळे, डॉ.व्यंकट सूर्यवंशी, डॉ.संजय जमदाडे, प्रा.चंद्रकांत मोरे, मेनका धुमाळे, रसुल दा.पठाण, सतीष नाईकवाडे, अनंत कदम, राजेसाहेब कदम, प्रा.बसवराज करकेली, संजय घारुळे, वृषाली पाटील, छगन घोडके, व्यंकट दंतराव, नवनाथ वाघमारे,प्रा.प्रशांत कांबळे, प्रा.डॉ.संगीता  सांगोले, देवदत्त मुंढे, संतोष गादेकर, नरहरी पारकर, प्रफुल्ल धामनगावकर, डॉ.सुशीलकुमार चिमोरे, प्रा.माधव वाघमारे,प्रकाश घादगिणे, शिवाजी स्वामी, रामराजे आत्राम, मंदाकिनी गोडबोले, विद्या बायस ठाकूर, उमा व्यास,नरसिंग कदम, प्रा.म.ई.तंगावार, ऍड.महेश मळगे, जहिरोद्दीन शेख, बालाजी भंडारे, नामदेव कोदरे, राजपाल पाटील, सुरेखा गुजलवार, ऍड.हाशम पटेल, धनंजय गुडसूरकर,बालाजी मुंडे, अनिल चवळे, मुरहारी कराड, विश्‍वंभर इंगोले, भास्कर गायकवाड, प्रा.संग्राम टेकले, प्रा.डॉ.क्रांती मोरे, शाहूराज  कांबळे, योगीराज माने, प्रा.गोविंद जाधव, विशाल अंधारे,रजनी गिरवलकर, डॉ.सुषमा गोमारे, विजया भणगे, इंदुमती सावंत, निलिमा देशमुख, शीला कुलकर्णी, सविता धर्माधिकारी,डॉ.राजेंद्र लातूरकर या जिल्हIस्तरीय कवीचा सहभाग  राहणार आहे.
       रविवारी, ( ८ मार्च २०२० ) सकाळी १० ते १२.३० या वेळात चौथ्या सत्राला सुरुवात होणार असुन त्यात " एकविसावे शतक आणि मराठी साहित्य " या विषयावर  परिसंवाद आयोजीत करण्यात आला आहे, यावेळी अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सूर्यनारायण रणसुभे हे राहणार असून, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.शेषराव मोहिते, प्रा.डॉ.शंकरानंद येडले, प्र्रा.डॉ.दुष्यंत कटारे, प्रा.डॉ.संभाजी पाटील, व प्रा.डॉ. संगीता मोरे यांचा सहभाग आहे .
दुपारी १२.३० ते २ दरम्यान " अण्णाभाऊ साठे  जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील मूल्य विचार " या विषयावर ,ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.माधव गादेकर यांच्या अध्यतेखाली  प्रा.डॉ.शिवाजी जवळगेकर, प्रा.डॉ.विजयकुमार करजकर, ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी यांचे मार्गदर्शन हाणार आहे.
 ४ वाजता लातूर ग्रंथोत्सवाचा समारोप  जिल्हा कोषागार अधिकारी राधाकृष्ण राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, डॉ.राजेंद्र लातूरकर व संजय घाडगे यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी या दोन दिवशीय लातूर ग्रंथोत्सवाला जिल्ह्यातील सार्वजनिक  ग्रंथालयातील ग्रंथालयीन कर्मचारी, पदाधिकारी, साहित्यप्रेमी,वाचकांनी  उपस्थित राहवे, असे आवाहन लातूर ग्रंथोत्सव   समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, सदस्य औदुंबर उकीरडे, सुनील सोनटक्के, डॉ.ब्रिजमोहन झंवर, महारुद्र मंगनाळे,डॉ.जयद्रथ जाधव  यांनी केले आहे.

                                   ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा