विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत
साथरोग नियंत्रण प्रयोगशाळेला मंजुरी

                लातूर,दि.20:- लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज रोजी  पर्यंत एकुण 25 कोरोना संशयीत व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी 18 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असुन ते सर्व अहवाल निगेटीव्ह आलेले असुन ७ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत एकही कोरोना संशयित / बाधित रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात नाही. तसेच कोरोना बाधित / संशयित रुग्णांसाठी एकुण ३७ खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ३० खाटांची वाढ करण्यात आली असुन कोरोना बाधित / संशियत रुग्णांसाठी एकुण ६७ खाटा  दिनांक 21 मार्च 2020 रोजी सायंकाळ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येणार  आहेत.
राज्याचे  वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने साथरोग नियंत्रण प्रयोगशाळा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथे मंजुर झाली असुन कोरोना संशयित रुग्णांची तपासणी, व इतर तपासण्या करण्यासाठी मुंबई,  राष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे जावे लागत होते आता त्या सर्व तपासण्या येत्या १० ‘ १५ दिवसात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथे होणार आहेत.  याबाबतचे मंजुरी आदेश दिनांक 20 मार्च 2020 रोजी प्राप्त झाले. सदर साथरोग नियंत्रण प्रयोगशाळेचा लाभ इतर सहा जिल्हयातील रुग्णांना तसेच सीमावर्ती भागातुन   येणा-या रुग्णांना मोठया प्रमाणात होणार आहे असे अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर यांनी कळविले आहे.
****



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु