प्रमाणपत्र
अभ्यासक्रम सुरु करण्याकरीता
अर्ज
मागविण्यासाठी मुदतवाढ
-
लातूर, दि.6:-महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्ष मंडळ,
मंबुई यांचे मार्फत राबविण्यात येत असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरीता
इच्छुक संस्थांकडून व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यांत येत आहेत. अर्ज करण्याचा
कालावधी दि.1 जानेवारी 2020 ते 28 फेब्रुवारी 2020 असा होता तो दिनांक 15 मार्च
2020 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे.
https://vti.dvet.gov.in या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
संचालयाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरता येईल मान्यता प्रक्रीया पुर्ण
करणे बाबतची माहिती मंडळाच्या माहिती पुस्तीकेमध्ये देण्यात आली आहे. युजर
मॅन्युअल(USER MANUAL) व माहिती पुस्तीका मंडळाच्या (www.msbve.gov.in) या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे. परिपूर्ण अर्जावरच पुढील कार्यवाही करण्यात येईल तसेच संस्थेला सर्व
प्रकारच्या शुल्काचा ऑनलाईन भरणा करावयाचा आहे.
अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
अधिकारी यांचेशी संपर्क सांधावा अथवा मंडळाचे संकेत स्थळ (www.msbve.gov.in)पहावे असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणअधिकारी लातूर
यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment