अपंग व वयाचे प्रमाणपत्र वितरणाचे
कामकाज 14 एप्रिल पर्यंत बंद
लातूर,दि.17:-लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे सर्व संस्थामध्ये मोठया प्रमाणात जनसमुदाय एकत्र येतील अशा बैठका / कार्यक्रम/ चर्चासत्र / कार्यशाळा / संमेलन / परीषद इत्यादीचे आयोजन करु नये असे कळविले असल्यामुळे तसेच रुग्णालयामध्ये गर्दी होवून नोवेल कोरोना व्हायरसचा प्रसार वाढू नये,खबरदारीचा उपाय म्हणुन   दि. 18 मार्च 2020 ते दि. 14 एप्रिल 2020 या कालावधीत अपंग प्रमाणपत्र, नोंदणी, तपासणी व वयाचे प्रमाणपत्राचे वितरण‍ शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद राहतील.
        तसेच अपंग व वयाचे प्रमाणपत्र वितरणाचे कामकाज अत्यावश्यक नसल्यामुळे बंद ठेवण्यात येत आहे.  यापूर्वी ज्या अपंग व्यक्तींना तपासणीची पुर्वनियुक्ती दिलेली आहे अशा अपंग व्यक्तींना प्राधान्याने पुर्ननियुक्ती देण्यात येईल्. त्यामुळे सर्व अपंग व्यक्तींनी वरील कालावधीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत येण्याचे टाळावे असे आवाहान अधिष्ठता डॉ. गिरीष ठाकुर यांनी केले आहे.
                                             ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा