आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन सुचनाचे पालन करावे
                                                    -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर,दि.19:-  आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण्‍ आढळत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचे संशयित रुग्ण्‍ राज्यातील विविध ठिकाणी आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. परदेश दौऱ्यावरुन आलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे व त्यामध्ये 14 दिवसांसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये पुढील मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
घरात विलगीकरण कक्षाबाबत मार्गदशक सूचना :- घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास बाथरुम जोडलेले आहे अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक जर त्या खोलीमध्ये राहणार असतील तर , त्यांनी रुग्णापासून कमीत कमी एक मिटर अंतरावर रहावे. परदेश दौऱ्यावर आलेल्या नागरिकांनी स्वत:हून शासकीय आरोग्य यंत्रणेस संपर्क साधून माहिती कळविणे बंधनकारक आहे.
परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर 14 दिवस 104 क्रमांकावर स्वत:ची  आरोग्य विषयक माहिती कळविणे बंधनकारक राहील. त्यामध्ये कोरोना सदृश्य आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास स्वत:हून नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी करावी. व वैद्यकीय सल्यानुसार भरती व्हावे. अशा व्यक्तीने घरातील वृध्द ,गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये.अशा व्यक्तीने घरातील त्यांचा वावर सिमीत ठेवावा.
अशा व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत सामाजिक किंवा धार्मीक कार्यक्रम ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळावे.अशा व्यक्तींनी त्यांचे पुर्वनियोजित महत्वाचे कामकाजाबाबत वेळीच संबंधित प्राधिकारी यांना कळवून कामकाजाच्या ठिकाणी गैरहाजर असल्याची पूर्व परवानगी घ्यावी.अशा व्यक्तीने  अल्कोहलयुक्त हॅण्ड सेंनीटायझर किंवा साबण आणि पाण्याने वारंवार व्यवस्थित हात धुवावेत. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले पाण्याचे ग्लास,कप ,जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुण,गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तु घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये.
अशा व्यक्तींनी पूर्ण वेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर 6 ते 8 तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरु नयेत. अशा व्यक्तींनी/ त्यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तींने / निकट सहवासीतांनी घरातील सुश्रुषे दरम्यान वापरलेले मास्क 5 टक्के ब्लिच सोल्यूशन किंवा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जंतुक करुन त्याची जाळून विल्हेवाट लावण्यात यावी.वापरलेला मास्क हा जंतुसंसर्ग युक्त समजावा.
घरी विलगीकरण केलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सूचना :-
एकाच नातेवाईकाने अशा व्यक्तीची सुश्रुषा करावी. अशा व्यक्तीच्या शरीराशी थेट संपर्क येणे टाळावे. आणि त्यांचे वापरलेले कपडे झटकू नये. घरातील विलगीरकण कक्षाची स्वच्छता करताना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हाताळताना डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. डिस्पोजेबल ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. नातेवाईक आणि अभ्यागतांना अशा व्यक्तींना भेटू देऊ नये.
घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेलल्या व्यक्तींना जर कोविड -19 बाबत लक्षणे आढळून आली तर त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना 14 दिवस घरातील विलगीकरण कक्षात ठेवावे. व पुढील 14 दिवस किंवा अशा व्यक्तींचा प्रयोगशाळा रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा.
घराच्या स्तरावर विलगीरकण कक्षाची स्वच्छता :-
घरात केलेल्या विलगीरकण कक्षातील असलेल्या व्यक्तीच्या खोलीमध्ये वारंवार हाताळल्या जाणाऱ्या वस्तुंचे (फर्निचर, बेड फ्रेम, टेबल ), 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीरण करावे.शौचालयाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण घरगुती ब्लिच किंवा घरगुती फिनालयने करावे. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेली कपडे, अंथरुण पांघरुण हे घरातील डिटर्जंट वापरुन वेगळे स्वच्छ धुवून वाळवावे.
        उपरोक्त मार्गदशक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे अन्यथा नियमानुसार कारवाई करुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात यईल, याची गांर्भीयपूर्वक नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष  जी. श्रीकांत यांनी  कळविले आहे.

****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु