कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषि यांत्रिकीकरण व नविन विहीरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर,दि.20:- नानाजी  देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लातूर जिल्हयातून निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी तोंड देण्यास सक्षम करणेसाठी कृषि यांत्रिकीकरण व नविन विहीर या घटकास प्रोत्साहन देणे, पिक रचनेनुसार आवश्यक कृषि औजारे घेण्यासाठी प्रकल्प गावातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे, कृषि यांत्रिकीकरणाच्याव्दारे रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान आणि इतर हवामान अनुकुल तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविणे तसेच नविन विहीर या घटकांमुळे संरक्षित सिंचनाची सोय करणे व पिक उत्पादन वाढविणेच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषि  संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकुल कृषि यांत्रिकीकरण व नविन विहीर या घटकास  शासनाने मान्यता दिलेली असून त्या बाबतच्या मार्गदर्शक सुचना http://dbt.mahapocra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध्‍ आहेत.
तरी प्रकल्प गावातील शेतकऱ्यांनी वरील संकेतस्थळावर आपले गावचे समूह सहाय्यकाच्या मदतीने ऑनलाईन नोंदणी करुन अर्ज करावा. ट्रॅक्टर सोबत BBF या यंत्रासाठी अर्ज करणे बंधन कारक राहील.
तसेच यांत्रिकीकरण व नविन विहीर या घटकांकरिता सोडत प्रक्रिया संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे करण्यात यईल. दि. 28 मार्च 2020 पर्यंत ऑनलाईनव्दारे प्राप्त होणाऱ्या अर्जाचा सोडत प्रक्रियेत समावेश करण्यात येईल व दिनांक 4 एप्रिल 2020 रोजी 11.00 वाजेपासून कार्यालयाची वेळ संपेपर्यंत सोडत प्रक्रिया लॉटरी पध्दतीने संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे करण्यात येईल.
सदरची सोडत प्रक्रिया ही त्या घटकाकरिता देण्यात आलेल्या संबंधित तालुक्याच्या लक्षांकाच्या मर्यादेत राहून करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी. या बाबत जिल्हयातील ईच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करण्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी आवाहन केले आहे.
                                                  ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा