जिल्हयातील 785 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे
संवर्गनिहाय आरक्षण जाहीर

        लातूर,दि.13:- महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2-अ च्या पोट नियम (1) व (2) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आणि याविषयी शासन अधिसुचना ग्राम विकास आणि जलसंधारण विभाग  दिनांक 25 मार्च 2015  अधिक्रमीत करुन महाराष्ट्र शासनाने दिनांक 5 मार्च 2020 पासून पुढील पाच वर्षाकरीता अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनु.जाती,अनु.जमाती आणि नागरिकांचा मागस प्रवर्ग यातील महिलांसह), यांच्यासाठी लातूर जिल्हयातील 785 ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची पदे खालील प्रमाणे अनुसूचि-अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे वाटप केली आहेत.
        अनूसूचि अ-प्रवर्ग, मिळालेली सरपंच पदे पुढील प्रमाणे आहेत- अनुसूचित जाती 160 (पैकी 80 महिलांकरीता),अनुसूचित जमाती 21 (पैकी 11 महिलांकरीता), नागरिकांचा मागास प्रवर्ग 212 (पैकी 106 महिलांकरीता), सर्व साधारण 321 (पैकी 196 महिलांकरीता), एकूण 785 (पैकी 393 महिलांकरीता ), त्याअनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 30 व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम), 1964 चे नियम 2-अ च्या पोट नियम (3) व (4) नूसार सोबत जोडलेल्या अनुसूचि-ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनु.जाती, अनु.जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह)
        यांच्यासाठी उक्त अनुसूची-अ प्रमाणे लातूर जिल्हयासाठी वाटप केलेली सरपंचाची पदे यासोबत जोडलेल्या अनुसूची-ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे लातूर जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये वाटप केल्याचे याव्दारे अधिसूचित करण्यात येत आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
अनुसूची ब नुसार महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग अधिसूचना क्र.गापनि-2020/प्र.क्र.6/पंरा-2 दिनांक 5 मार्च 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2-अ (3) मधील तरतुदीनुसार लातूर जिल्हयातील ग्रामपंचायतींसाठी अधिसूचित केलेले सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे.
        लातूर जिल्हयातील  एकूण ग्रामपंचायतीची संख्या,785  अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षीत सरपंचाची पदे, अनु.जाती- 80–महिला- 80, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षीत सरपंचाची पदे, अनु.जमाती -10,महिला-11, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षीत सरपंचाची पदे,ना.मा.प्र.-106, महिला-106, खुला प्रवर्गासाठी सरपंचाची पदे खुला प्रवर्ग-196,महिला-196 .
                                              ****  

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु