जिल्हयातील 408 ग्रामपंचायतींची प्रभाग
रचना व आरक्षण कार्यक्रम स्थगित
लातूर,दि.17:- राज्य निवडणूक आयोगाचे 17 मार्च 2020 यासोबत
पाठविण्यात येत आहे. सदरील पत्रान्वये मा. राज्य निवडणूक आयोग यांनी करोना विषाणू(कोव्हिड-19)मुळे
उदभवलेल्या गंभीर परिस्थीतीचया पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या सुरु
असलेले सर्व कार्यक्रम दिनांक 17 मार्च 2020 रोजी ज्या टप्प्यावर आहेत त्या
टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. त्या अनुषंगाने जुलै 2020 ते
डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या लातूर जिल्हयातील 408 ग्रामपंचायतींची
प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशापर्यंत
स्थगीत करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कळविले आहे.
त्याचप्रमाणे सन 2020 ते 2025 या कालावधीतील गठीत होणाऱ्या
लातूर जिल्हयातील सर्व 785 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीव्दारे
संबंधीत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत नेमून देणेकरीता दिनांक
23 मार्च 2020 व 24 मार्च 2020 या तारखा निश्चीत करण्यात आल्या होत्या.सदरील
आरक्षण हे सर्व संबंधीत ग्रामपंचायतीचे सदस्य/ नागरिक यांचे समक्ष काढावयाचे
असल्याने आरक्षण काढतेवेळी प्रत्येक तालुक्याच्या
तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मोठया प्रमाणावर गर्दी होते. करोना विषाणू (कोव्हिड-19) चे संक्रमण वाढू नये या करीता
राज्य शासनाने निर्गमीत केलेले निर्देश विचारात घेवून दिनांक 23 मार्च 2020 व 24
मार्च 2020 रोजी तालुका स्तरावरील सरपंच पदाची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली
असून सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल, याची
सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले
आहे.
***
Comments
Post a Comment