जिल्हयातील 12 प्रवासी/सहवासितांचे स्वॉब नमुने निगेटीव्ह
लातूर,दि.17:- सद्यस्थितीत लातूर जिल्हयात आजतागायत कोरोनाबाबत 17 प्रवाशी/सहवासितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी 12 प्रवाशी /सहवासितांचे अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. 5 प्रवाशी/सहवासितांचे स्वॅब तपासणी अहवाल येणार आहेत. कोरोनाविषाणूचा संसर्ग बाबत सदृश्य लक्षणे असणारा एकही रुग्ण्‍ नाही. सद्य‍िस्थतीत लातूर जिल्हयात Isolation ward मध्ये कोरोना बाधित रुग्ण्‍ दाखल नाही. खबरदारी म्हणून दोन विदेशातून आलेल्या प्रवाशीचे स्वॉब घेण्यात आलेला आहे. कोरोनाविषाणूचा संसर्ग बाबत साथीच्या आजावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत औषोधोपचार व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत व येत आहेत. तरी नागरिकांनी घाबरु नये, काळजी घ्यावी.
महत्वाची सूचना :-कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शंका आली तर घाबरु नका, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, तुम्ही या विषाणूग्रस्त भागात प्रवास केला असेल आणि ताप खोकला आणि श्वास घ्यावयास त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टराचा सल्ला घ्यावा व त्यांच्या सल्याने रुग्णालयात भरती व्हावे. लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या व उपचारासाठी शासकीय रुग्णालयांशी संपर्क करावा, रामेश्वर ता.लातूर येथील मयत झालेले व्यक्ती ही यकृताच्या आजारामुळे मृत्यू पावलेली आहे. त्या व्यक्तीस कोरोना विषाणूची बाधा झालेली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हयात आजपावेतो एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण्‍ नाही असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आलेले आहे.
राष्टीय कॉल सेंटर क्रमांक. 91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र. 020-26127394 व टोल फ्री हेल्पलाईन क्र. 104 असून लातूर जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र.02382-246803 आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
                                      
 ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु