संश‍यित कोरोना व्यक्तींना कोरोना आजाराची
कोणतीही लक्षणे नाहीत, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये
                                                              
*विलासराव देशमुख शाकसीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत  एकही कोरोना सदृश्य रुग्ण नाही

लातूर, दि.13 :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेत आज रोजी एकाच कुटूंबातील 7 संशयित कोरोना व्यक्तीना जिल्हा निगराणी कोरोना समिती यांच्या मार्फत या संस्थेमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या तपासणीसाठी आणण्यात  आले होते.
या संस्थेतील तज्ञ डॉक्टरांनी या संशयितांचे रुग्णालयापासून विलगीकरण केले व त्यांची तपासणी केली असता यापैकी कोणत्याही व्यक्तीला कोरोना आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तींचे नमुने पुणे येथील राष्ट्र्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल संस्थेत दोन ते तीन दिवसात प्राप्त होईल. तो पर्यंत या सर्व संशयीतांस त्यांच्या राहत्या घरात जिल्हा निगराणी कोरोना समिती यांच्या  देखरेखीखाली विलगीकरणासाठी संस्थेमार्फत हस्तांतरीत  केले आहे.
सद्यस्थितीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थामध्ये एकही कोरोना सदृश / बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. असे  अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु