प्रदेशिक परिवहन कार्यालयामार्फत
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपयायोजना

लातूर,दि.19:- प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामानिमित्त मोठया प्रमाणात अभ्यांगतांचे येणे जाणे असल्यामुळे गर्दी जमा होत असते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची संभावना कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून परिवहन आयुक्त यांच्या परिपत्रकान्वये मार्गदर्शक सुचना नुसार पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.
दि. 31 मार्च 2020 पर्यंत शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी बंद राहील. पक्क्या अनुज्ञप्ती चाचणी  दि. 31 मार्च 2020 पूर्वी संपते त्यांची चाचणी घेण्यात येईल.
सार्वजनिक वाहन बिल्ला (बॅज) व कंडक्टर बॅजसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध्‍ करुन देण्यात आली असून सार्वजनिक वाहन बिल्ला (बॅज) व कंडक्टर बॅजसाठीची चाचणी दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात  आलेली आहे.
अनुज्ञपतीमध्ये नवीन वर्गाची नोंद घेण्ययासाठी  ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध्‍ करुन देण्यात आली असून अनुज्ञप्तीमध्ये नवीन नोंद घेण्यासाठीची चाचणी दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात आली आहे.
दि. 31 मार्च 2020 पर्यंत कार्यालयात केवळ पुढील  कामकाज करण्यात येत आहे.
अनुज्ञपतीचे नुतनीकरण, वाहनाची पुर्ननोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना संबंधी कामकाज,सर्व नविन नोंदणी कामकाज वाहन विरकाचे ठिकाणीच करणे (CRTM कामा व्यतिरिक्त),खटल्या संबंधी आवश्यक कामकाज.
सर्व कॅम्प कार्यालयातील संबंधीत कामकाज दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात  राहील. नवीन वाहन नोंदणीचे  कामकाज संबंधीत  मोटार वाहन निरीक्षक वाहन वितरकाच्या Show Room ला भेट देऊन त्याच ठिकाणी करत आहे.
तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतरीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणी घेते वेळी मोटार वाहन निरीक्षक कार्यालयीन कर्मचारी यांना खाली दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
त्यांनी हॅण्ड गलोव्हज व मास्क घालून कामकाज करावे. वाहनांची खिडकी उघडी ठेवावी. योग्यता प्रमाणपत्र नुतरीकरण, पक्की अनुज्ञप्ती चाचणी घेते वेळी अथवा वरील संदर्भ क्र. 02 मधील परिपत्रकात नमूद केलेले कामकाज करत असताना कार्यालयामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांना सुचना देण्यात आल्या आहेत. कार्यालयात प्रतिबांधात्मक उपाय म्हणून कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर कामाची चौकशी करुन कागदपत्रे तपासून वर नमूद केलेल्या कामसाठीच अभ्यागतांना कार्यालयात सोडले जात आहे.
कार्यालयाच्या प्रवेश व्दारावर खालील प्रमाणे सुचना फलक प्रदर्शिंत करण्यात आला आहे. कार्यालयात गर्दी करु नये, परिवहन कार्यालयाचे काम हे जीवनावश्यक बाब नसल्याने परिस्थीतची पुर्व पदावर आल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यानंतर आपण आपले काम करुन घेऊ शकतो. जीवन अमुल्य आहे काळजी घ्या. कोरोना पासून बचाव हाच एकमेव उपाय आहे.
कार्यालयीन अधिकारी कर्मचारी कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून तोंडाला मास्क सॅनीटायझरचा वापर करुन योग्य ती खबरदारी घेत आहेत.  कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयात अत्यावश्यक कामांना प्राधान्य देण्यात येईल. कार्यालयामध्ये कोणीही गर्दी करु नये असे प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
                                           ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु