निवृत्ती
वेतन धारकांनी जिल्हा कोषागार
कार्यालय
लातूर येथे येण्याचे टाळावे
लातूर,दि.18:-
जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर
अंतर्गत जवळपास 17300 निवृत्तीवेतनधारक निवृत्ती वेतन घेतात. निवृत्तीवेतन विषयक
अडीअडचणींसाठी जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये राज्याच्या इतर जिल्हयांतून दररोज
येणाऱ्या निवृत्ती वेतन धारकांची संख्या जास्त आहे. सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये
कोरोना विषाणूंचा प्रसार झाला आहे. त्यामुळे आरोग्य विषयक गंभीर समस्या निर्माण
झाली असून कोरोना विषाणूंमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्या अनुषंगाने कोरोना विषाणूंचा प्रसार/
संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने
पुढील आदेशापर्यंत निवृत्तीवेतन धारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर येथे
येण्याचे टाळावे. तसेच त्यांनी त्यांचे वैयक्तिक अडचणी/ कामासाठी कार्यालयाच्या
02382-245196 या दूरध्वनी क्रमांकावरुन संपर्क साधावा. तसेच काही लेखी अर्ज /
म्हणणे असल्यास त्यांनी कार्यालयाच्या to.latur@zillamahakosh.in या ई-मेल आयडीवर ते
सादर करावे. असे जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन एस. राऊत यांनी प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment