सिरसल येथून जर्मनीकडे 16.5
टन द्राक्ष निर्यात
लातूर,दि.17:- सहयाद्री ॲग्रो प्रोडयुसर कंपनी मार्फत अर्थमेड
ॲग्रो एक्सपोर्ट औसा येथून द्राक्षाचे पहिले कंटेनर जर्मनीकडे जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी दत्तात्रय गवसाने कृषि उपसंचालक राजकुमार मोरे यांच्या हस्ते पूजन करुन
पाठविण्यात आले.
जागतीक
हवामानाच्या बदलामुळे द्राक्ष निर्यातीवर कोरोनामुळे चिंतेचे ढग निर्माण झाले
आहेत. द्राक्षामुळे प्रतिकार शक्ती वाढविण्यासा मदत होत असल्यामुळे ग्राहाकाकडून
आरोग्यासाठी द्राक्ष खरेदी केली जातील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी
सिरसल येथील शेतकरी श्रीमती प्रभावती शिवाजी धानुरे यांचे 16.5 टन द्राक्ष निर्यात
करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
***
Comments
Post a Comment