BS4 मानकांच्या वाहनांची नोंदणी बंद
लातूर,दि.13:- सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल जनहित याचिका क्र.13029/1985 मध्ये न्यायालयाने 01 एप्रिल 2020 नंतर देशभरात भारत स्टेज -6 मानांकन वाहने विक्री व नोंदणी करण्यास मनाई केली आहे.
सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, त्यांनी भारत स्टेज-4 मानांकनाची वाहने खरेदी केली असल्यास त्यांची नोंदणी 31 मार्च 2020 पूर्वी होऊन त्यांना नोंदणी क्रमांक जारी होणे आवश्यक आहे. भारत स्टेज-4 मानांकनाची वाहने दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी नोंदणी न झाल्यास रस्त्यावर वापरता येणार नाहीत. दि. 31 मार्च 2020 रोजी वा त्यापूर्वी होणारी नोंदणीची गर्दी पाहता तसेच ऐनवेळी कागदपत्रात त्रुटी उद्भवण्याची शक्यता पाहता वाहन मालकांनी त्यांची वाहने ताबडतोब नोंदणीसाठी सादर करावीत.
यापूर्वी खरेदी केलेल्या काही वाहनांच्या बाबतीत कागपत्रातील त्रुटीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणाने नोंदणीची प्रक्रीया अपूर्ण राहील असल्याची शक्यता आहे. केवळ शुल्क व कर भरल्याने, व्हीआयपी क्रमांकाची फी भरल्याने अथवा वाहन मोटार वाहन निरीक्षकाकडे तपासणीसाठी सादर केल्यामुळे नोंदणी प्रक्रीया पूर्ण होत नाही तर वाहनास नोंदणी क्रमांक जारी झाल्यावरच सदर प्रक्रीया कायदेशीररीत्या पूर्ण होते.
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी वाहन वितरक व वितकर प्रतिनिधी यांच्या सोबत दि. 12 मार्च 2020 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार वाहन विक्री केल्यानंतर संबंधीत वाहनास नोंदण क्रमांक जारी करुनच वाहन वाहन मालकाच्या ताब्यात देण्यात यावे व ज्या वाहन वितरकांकडे नवीन नोंदणी वाहने काही कारणास्तव प्रलंबीत असल्यास त्या वाहनाची नोंदणी प्रक्रिया तात्काळ पुर्ण करण्यात यावी व सदर  BS4 मानांकनाची वाहने दि. 31 मार्च 2020 पुर्वी नोंदणी होतील याची दक्षता घ्यावी.
बाहेर जिल्हयातून तात्पुरते नवीन वाहन नोंदणी प्रमाणपत्र (CRTM) घेऊन येणाऱ्या वाहनांना त्याच दिवशी कार्यालयात नवीन वाहन नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करुनच वाहन ताब्यात देण्यात येईल.
या जिल्हयातून इतर जिल्हयात तात्पुरते नवीन वाहन नोंदणी प्रमाणपत्र  (CRTM) घेऊन जाणाऱ्या  BS4 नामांकनाच्या वाहनांस यापुर्वी अथवा यापुढे जारी करण्यात आलेले तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्राचा मुदतीचा अवघी जारी केल्यापासून एक महिन्याचा असला तरी BS4 मानांकनाची वाहने दि. 31 मार्च 2020 पर्यंत नोंद करुन घेण्याची जबाबदारी संबंधीत वाहनधारक यांची राहील. तसेच अशी जारी केलेली तात्पुरते नवीन वाहन नोंदणी प्रमाणपत्र (CRTM) न्यायालयाने आदेशाप्रमाणे दि. 31 मार्च 2020 पर्यंतच वैध राहतील.
राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य, खंडपीठ नागपूर यांच्या आदेशानुसार वाहन वितरकांनी वाहन मालकाच्या ताब्यात वाहन देताना दोन हेल्मेट देऊनच वाहन ताब्यात देण्यात यावे व हेल्मेट दिल्याची नोंद Tax Invoice मध्ये करण्यात यावी व वाहन धारकांनी दोन हेल्मेट मिळाल्याची  करुनच वाहन ताब्यात घ्यावे. मोटार वाहन निरीक्षक यांनी वाहन धारकांना दोन हेल्मेट दिल्याची खात्री करुन व Tax Invoice  तपासूनच वाहन नोंदणी करावी व त्याचे स्वतंत्र हेल्मेट नोंदणी वही वितरकांनी जतन करावी.
BS4 मानांकनाची नवीन वाहन नोंदणी काही करणास्तव आपुर्ण राहिल्यास किंवा वितरकाकडील प्रलंबीत असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच परिवहन आयुक्त , म.रा. मुंबई यांच्या आदेशानुसार दि. 21 मार्च (शनिवार), 22 मार्च (रविवार), 25 मार्च (गुढीपाडवा), 28 मार्च (शनिवार), 29 मार्च (रविवार) या शासकीय सुट्टीच्या दिवशी वाहन धारकांना वाहनाची नोंदणी करता यावी म्हणून केवळ BS4 वाहनांची नवीन वाहन नोंदणी प्रक्रीया वेळेत पुर्ण करण्यासाठी कार्यालय चालू ठेवण्यात येणार आहेत, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
                                            ****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु