नागरिकांनी खबरदारी घ्यावी
पालकमंत्री अमित देशमुख यांचे आवाहन

लातूर,दि.20:कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र दक्षता घेण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लातूर जिल्हा आणि शहरातील नागरिकांनी अधिक सतर्क रहावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री  अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. शासनस्तरावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना नागरिकांची साथ मिळणे गरजेचे आहे. नागरिकांनी आवश्यक्ता नसताना घरा बाहेर पडू नये, अनावश्यक गर्दी टाळावी, त्याच प्रमाणे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आपले हात सातत्याने स्वच्छ धुवावेत, चेहऱ्याला हात लाऊ नयेत, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करुनये किंवा अशा कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अन्यत्र प्रवास करणे टाळावे, धार्मिक कार्यक्रम विवाह पुढे ढकलावेत,  गैर समज पसरविणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये त्याच प्रमाणे शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन ही पालक मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
                                                         ****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु