सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विविध उपक्रम
सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विविध उपक्रम लातूर, दि. १४ : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या शासन धोरणास अनुसरुन १४ ते २८ जानेवारी, 2025 या कालावधीत “ मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा ” सार्वजनिक बांधकाम विभाग , जलसंपदा विभाग व मृद व जलसंधारण विभाग या तिन्ही विभा गां च्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जात आहे. या अंतर्गत विभागातील अधिकारी , कर्मचारी यां च्या साठी सार्वजनिक बांधकाम मंडळ, बांधकाम भवन येथे 17 व 18 जानेवारी, 2025 या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 17 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 3 वाजतापासून स्पर्धेस सुरुवात होईल. निबंध स्पर्धा , कविता लेखन , हस्ताक्षर स्पर्धा , युनिक कोड लिपीत टंकलेखन करण्याची स्पर्धा , शुध्दलेखन स्पर्धा , इंग्रजी शब्दांचा मराठीत अनुवाद आदी स्पर्धा यावेळी होतील. 18 जानेवारी, ...