जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचे वितरण

 


·         छातीविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे बनले निक्षय मित्र

लातूर, दि. ०८ : प्रधानमंत्री टीबी क्षयरोगमुक्त भारत अभियान अतंर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकरी कार्यालय येथे क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचे वितरण करण्यात आले. सर्व क्षयरुग्णांनी वेळेवर आणि पूर्ण उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, राज्य पीसीपीएनडीटी समितीचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तांबारे एस. एन., वैद्यकीय अधिकारी  डॉ. आनंद कलमे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एच. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत यावेळी उपस्थित होते.

क्षयरुग्णांनी मानसिकदृष्टया खचून न जाता उपचारासोबत पोषक आहार घ्यावा. पूर्ण कालावधीच्या औषधोपचाराने क्षयरोग बरा होतो, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच शासकीय व अशासकीय यंत्रणा, समाजातील दानशुर व्यक्ती यांनी नियक्ष मित्र बनून क्षयरुग्णांना पोषण आहार उपलब्ध करुन देण्याचे अवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लातूर येथील छातीविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांच्या वाढदिवसानिमित्य ५० पोषण आहार कीटचे उपस्थित क्षयरुग्णांना वाटप करण्यात आले. टीबीमुक्त भारत अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेवून उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना पोषण आहाराबाबत मदत करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तांबारे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम समन्वयक सुबोध मगरे यांनी केले, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत