सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विविध उपक्रम

 

सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विविध उपक्रम

 

                लातूर, दि. १४  :   मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या शासन धोरणास अनुसरुन १४  ते २८ जानेवारी, 2025 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा सार्वजनिक बांधकाम विभाग , जलसंपदा विभाग व मृद व जलसंधारण विभाग या तिन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जात आहे. या अंतर्गत विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंडळ, बांधकाम भवन येथे 1718 जानेवारी, 2025 या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.  

            17 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 3 वाजतापासून स्पर्धेस सुरुवात होईल. निबंध स्पर्धा, कविता लेखन, हस्ताक्षर स्पर्धा, युनिक कोड लिपीत टंकलेखन करण्याची स्पर्धा, शुध्दलेखन स्पर्धा, इंग्रजी शब्दांचा मराठीत अनुवाद आदी स्पर्धा यावेळी होतील.

18 जानेवारी,  2025 रोजी सकाळी 10 वाजतापासून घोषवाक्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा , माझ्या आयुष्यातील संस्मरणीय घटना, कविता वाचन, अभिवाचन स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ.सलीम शेख यांनी तिन्ही विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कोणत्याही एका उपक्रमात सहभाग नोंदविण्याबाबत परिपत्रकान्वये आवाहन केले आहे. तसेच या कालावधीत मराठी भाषा पुस्तक विक्रीचे स्टॉल (पुस्तक जत्रा) चे आयोजन करण्यात आलेले आहे.

स्पर्धेचा समारोप कार्यक्रम 18 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.

****   

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत