"वाचन संकल्प महाराष्ट्राचा”उपक्रमांतर्गत ‘वाचन कौशल्य कार्यशाळा व सामुहिक वाचन’उपक्रम
"वाचन
संकल्प महाराष्ट्राचा”उपक्रमांतर्गत
‘वाचन
कौशल्य कार्यशाळा व सामुहिक वाचन’उपक्रम उत्साहात
लातूर,दि.31:- जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय व साने गुरुजी शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन
संकल्प महाराष्ट्राचा’उपक्रमांतर्गत ‘वाचन कौशल्य कार्यशाळा’ आयोजित करण्यात
आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिदास माने यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वरूप व
उददेश याबाबत उपस्थितांना अवगत केले.
व्याख्याते म्हणून जेष्ठ कवी भारत सातपुते
यांनी वाचनाबद्दल रुची व लेखन कौशल्य याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वेगवेगळी उदाहरणे
देवून चांगले जीवन जगण्यासाठी, ज्ञान वृध्दीगंत करण्यासाठी वाचनाची आवश्यकता का आहे याचे महत्व उपस्थित विद्यार्थ्याना पटवून दिले. त्याचबरोबर कार्यक्रमांच्या
अध्यक्ष तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर यांनी वाचनाचे महत्त्व, उद्दिष्ट समजावून सांगितले. नवीन वर्षानिमित्त
दररोज एक तास अवांतर वाचन करण्याचा संकल्प करावा. तसेच शासकीय ग्रंथालयातील ग्रंथसंपदेचा
लाभ घेण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांनी
शासकीय ग्रंथालयाचे सभासदत्व घेण्याबाबत आवाहन
केले.
कार्यशाळेत साने गुरूजी शैक्षणिक संकुलातील एकूण 150 विद्यार्थ्यानी
सहभाग नोंदवून पुस्तकाचे सामूहिक वाचन केले. प्रत्येक विद्यार्थ्यास वेगवेगळे ग्रंथ
वाचनासाठी देण्यात आलेले होते. ग्रंथ वाचून त्याबाबतचे अभिप्राय विद्यार्थ्यांकडून
घेतले जाणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालयातील सुधीर आचार्य, हि.भ पाटील,
तसेच साने गुरूजी शैक्षणिक संकुलातील मुख्याध्यापक शिक्षक व इतर कर्मचारी वृंद उपस्थित
होते.
****
Comments
Post a Comment