सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

 सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

लातूर दि. 13 :  वर्गातील संस्था म्हणजेच 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 20 ते 31 जानेवारी, 2025 या कालावधीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यात येणार आहे. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज शासकीय विभागातील (सहकार‍ विभागातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी वगळून), स्थानिक स्वराज्य संस्थेतील, सहकारी संस्थेतील कायम कार्यरत अधिकारी, कर्मचारी (वरीष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेल्या कर्मचारी), प्रमाणित लेखापरीक्षक , वकील (पाच वर्षाचा कामाचा अनुभव), शासकीय सेवेतून, स्थानिक स्वराज्य संस्थेतून सेवानिवृत्त झालेला अधिकारी, कर्मचारी (वयाची 65 वर्ष पेक्षा जास्त नसलेल्या) यांच्याकडून मागविण्यात आले आहेत.  

विहीत नमुन्यातील अर्ज 20 ते  31 जानेवारी, 2025 या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) लातूर,बीड, नांदेड व धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळू शकतील.

तसेच या संदर्भातील विहीत नमुन्यातील अर्ज जाहीर नोटीस बोर्डावर प्रसिध्द केले आहेत. अर्जदारांनी  विहीत नमुन्यातील अर्ज 31 जानेवारी,2025 अखेर संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. याबाबतची जाहीर सूचना विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांचे कार्यालयाचे नोटीस बोर्डावर व संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे विभागीय सहनिबंधक यांनी कळविले आहे.

****

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत