राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर ३ जानेवारी रोजी लातूर दौऱ्यावर
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर ३ जानेवारी रोजी लातूर दौऱ्यावर
लातूर, दि. ०१ : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर ह्या शुक्रवार, ३ जानेवारी २०२५ रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
श्रीमती रहाटकर यांचे ३ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी १ वाजता लातूर येथे आगमन होईल आणि 'महिलांसाठी वन स्टॉप सेंटर' येथे भेट देतील. तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांची विविध अंतर्गत समितींच्या अनुषंगाने बैठक घेतील. दुपारी ४ वाजता श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सायंकाळी ६.३० वाजता लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment