महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर, दि. 31 (जिमाका) : महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा लातूर शहरातील 25 परीक्षा केंद्रांवर रविवार, 2 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता ते दुपारी 12 या कालावधीत होत आहे. त्याअनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
लातूर शहरात बार्शी रोड येथील दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड बीसीए, अंबोजोगाई रोडवरील कॉलेज ऑफ कम्प्युटर सायंस अँन्ड इन्फॉरमेशन टेक्नालॉजी (कॉक्सिट), बार्शी रोडवरील दयानंद सायन्स कॉलेज, नांदेड रोडवरील यशवंत विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, नारायण नगर येथील परिमल माध्यमिक विद्यालय, खाडगाव रिंगरोड येथील श्रीश्री रवीशंकर विद्यामंदिर, खाडगाव रोड येथील सरस्वती विद्यालय, दयाराम रोड येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, शाहू चौक येथील ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खाडगाव रोड येथील श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, बसवेश्वर चौक येथील राजर्षी शाहू ज्युनियअर सायन्स कॉलेज, सरस्वती कॉलनी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, नंदीस्टॉप येथील पुरणमल लाहोटी शासकीय पॉलिटेक्निक, पेठ येथील किड्स इन्फो पार्क, बार्शी रोडवरील दयानंद कला महाविद्यालय, दयानंद लॉ कॉलेज, बसवनप्पा वाले इंग्लिश मिडीयम स्कूल, अंबाजोगाई रोड येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायंन्स अँन्ड इन्फॉरर्मेशन टेक्नॉलिजी (कॉक्सीट) (तिसरा व चौथा मजला), मुख्य बसस्थानकाच्या समोरील राजर्षी शाहू सायंन्स ॲन्ड आर्टस कॉलेज, राजर्षी शाहू कॉमर्स कॉलेज, सिताराम नगर येथील जयक्रांती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अंबेजोगाई रोडवरील कॉक्सीट कँम्पस येथील श्रध्दा इंटरनॅशनल स्कूल, शाम नगर येथील श्री केशवराज विद्यालय या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत या परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. शंभर मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसारमध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. हे आदेश 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.
*****
Comments
Post a Comment