500 हेक्टरखालील तलाव जाहीर लिलाव बोलीमध्ये मत्स्यव्यवसाय संस्थांनी सहभागी व्हावे
500 हेक्टरखालील तलाव जाहीर लिलाव बोलीमध्ये
मत्स्यव्यवसाय संस्थांनी सहभागी व्हावे
लातूर,दि.31:- 500 खालील जलक्षेत्रे असलेल्या चाकूर तालुक्यातील जानवळ (13 हेक्टर) , केंद्रेवाडी -(31.83) हेक्टर अहमदपूर तालुक्यातील मोळवण (9.33) हेक्टर व जळकोट तालुक्यातील डोंगरगाव (34.21) हेक्टर हे पाटबंधारे तलाव लातूर जिल्ह्यातील पात्र मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेअंतर्गत (बोली) जाहीर लिलाव पध्दतीने ठेक्याने देण्यात येणार आहेत. यासाठी 7 जानेवारी, 2024 रोजी दुपारी 3 वाजता सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, लातूर यांच्या दालनात जिल्हास्तरीय तलाव ठेका समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेमध्ये लातूर जिल्ह्यातील पाटबंधारे तलाव ठेक्याने देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. लिलावातील तलावाची न्युनतम ठेका रक्कम, तलाव ठेका सुरक्षा अनामत व वार्षिक इष्टतंम मत्स्यबोटूकली संचयन किंमत 10 टक्के रक्कम तसेच अटी शर्ती व सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, लातूर यांच्या कार्यालयात (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत पाहण्यास मिळतील. तरी पात्र संस्थेने बोली लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, लातूर यांनी केले आहे.
भाग घेणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना दिनांक 3 जुलै 2019 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रांची पुर्तता दिनांक 6 जानेवारी, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, लातूर कार्यालयाकडे करावी लागेल, असे लातूर येथील मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त तेजस्विनी करळे यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment