शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी 14 ते 26 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी
14 ते 26 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत
लातूर, दि.13
:- क्रीडा
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन
गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा
मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिछत्रपती राज्य
क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), असे पुरस्कार
प्रदान करण्यात येतात.
29 डिसेंबर 2023 व 25 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली 2023 विहीत केली आहे.
या नियमावलीनुसार सन 2023-24 या
वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू,
दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेली खेळाडू, व्यक्ती 14 ते 26 जानेवारी, 2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक
क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर स्क्रोलींग लिंक (Scrolling
Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत 26 जानेवारी 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत
फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment