राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान योजनेसाठी मधुक्रांती पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी

 

राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान

योजनेसाठी मधुक्रांती पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी

लातूर, दि.7 :- राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या अभियानांतर्गत  लघु अभियान I, लघु अभियान II    लघु अभियान III समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अदययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल हे ऑनलाइन पोर्टल विकसित केलेले आहे. या पोर्टलवर मधुमक्षिकापालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मधुक्रांती पोर्टलवरील नोंदणीमुळे मधुमक्षिका पालकांना नोंदणीकृत / मान्यता प्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळते. नोंदणी धारकांना 1 लाखापर्यंत मोफत विमा उपलब्ध होतो. विना अडथळा मधुमक्षिका पेटयांचे स्थलांतर सुविधा मिळते.

नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड (नाव, जन्मतारीख, पत्तासहित), द्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी(आकार-200 kb पर्यंत). मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-100 kbपर्यंत) . नोंदणी शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने अदा करता येते.

अ.क्र.

स्वमालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या

 (१० फ्रेम)

भरावयाचे नोंदणी शुल्करु.

१०ते१००

२५०

१०१ते२५०

५००

२५१ते५००

१०००

५०१ते१०००

२०००

१००१ते२०००

१००००

२००१ते५०००

२५०००

५००१ते१००००

१०००००

१०००० पेक्षा अधिक

२०००००

जास्तीत जास्त मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणीकरिता वेबसाईट - madhukranti.in/nbb असून अधिक माहितीसाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या 011-23325265, 23719025 या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या (020) 2970328 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत