राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे लातूर येथे स्वागत
लातूर, दि. ०२ : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे आज लातूर दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.
प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर शहर महानगरपालिका सहायक आयुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यावेळी उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment