होमबेस्ड केअर गिव्हर कर्मचाऱ्यांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी
होमबेस्ड केअर गिव्हर कर्मचाऱ्यांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी
लातूर, दि. 16 : इस्राईलमध्ये नोकरीच्या संधींसाठी कुशल होमबेस्ड केअर गिव्हर कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्राईल मधील (नॉन वॉर झोन) सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे.
भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने होमबेस्ड केअर गिव्हर कर्मचाऱ्यांना इस्राईलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शासनाकडून सर्वोतपरी या होमबेस्ड केअर गिव्हर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधावा.
ए.एन.एम.,जी.एन.एम.,बी.एस्सी.नर्सींग, पोस्ट नर्सिंग व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांकडून होमबेस्ड केअर गिव्हर पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या व्यक्तींना इस्राईलमधील (नॉन वॉर झोन) सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे, यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांना 1लाख 31 हजारापर्यंत दरमहा वेतन मिळेल. या पदासाठी 25 ते 45 वर्षे वयोगटातील अर्जदार अर्ज करू शकतात. कर्मचाऱ्यांना किमान दोन वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. त्याचप्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे.
या नोकरीसाठी उमेदवारांने जवळपास 1,42,885 रुपये विमान तिकीट खर्च करणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक 02382-299462 व नोंदणीसाठी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा.सु.मरे यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment