लातूर जिल्ह्यातील उद्योगांनी उद्यम नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर जिल्ह्यातील
उद्योगांनी उद्यम नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर, दि.7
:- एमएसएमईडी कायदा -2006 अंतर्गत उद्योगासाठी
ज्ञापन स्विकृती कायदा सन 2006 पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यातंर्गत उद्यम
ज्ञापन स्वीकृतीपत्र, नोंदणीपत्र ऑनलाईन प्राप्त होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -
घुगे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व उत्पादन करणारे उद्योग घटक, सेवा उद्योग व इतर व्यवसाय
करणारे व्यावसायिक यांनी उद्यम नोंदणी करावी, असे कळविले असूनही नोंदणी विनाशुल्क आहे.यासाठी
उद्योगांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये यंत्र सामुग्री गुंतवणूक 1 कोटी रुपये
आणि आर्थिक उलाढाल 5 कोटी रुपये पर्यंत असलेल्या उद्योगांचा समावेश सुक्ष्म उद्योगात
, यंत्रस सामुग्री गुंतवणूक 10 कोटी रुपये आणि आर्थिक उलाढाल 50 कोटी रुपयेपर्यंत यंत्रसामुग्री
गुंतवणूक आणि 250 कोटी रुपये आर्थिक उलाढाल मर्यादा असेलल्या उद्योगांचा समावेश मध्यम
उद्योगात करण्यात आला आहे. त्यानुसार उद्योजकांनी आपल्या उद्योगांची नोंदणी
https://udyamregistration.gov.in या संकेतस्थळावर करावी, असे जिल्हा उद्योग केंद्राचे
महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांनी आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment