राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वाव यांचा लातूर दौरा
वृत्त क्र. ०६
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वाव यांचा लातूर दौरा
लातूर, दि. ०२ : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा हे दिनांक ६ व ७ जानेवारी २०२५ रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
डॉ. पी. पी. वावा यांचे ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता धाराशिव येथून लातूरला आगमन होईल व मुक्काम. ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्त, नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांची बैठक होईल. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक घेतील. सायंकाळी ५ वाजता मोटारीने बीडकडे प्रयाण करतील.
***
Comments
Post a Comment