लातूर येथे रविवारी विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आयोजन
लातूर, दि. ०३ : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मुंबई येथील महाराष्ट्र
राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण व लातूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ५
जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा
महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. लातूर येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोरील लक्ष्मीप्रयाग
बॅक्वेटस येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च
न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा लातूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नीरज
पी. धोटे यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा लातूर जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे
अध्यक्ष व्ही. व्ही. पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक
सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची यावेळी
प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यक्रमात कायदेविषयक मार्गदर्शनासोबतच विविध शासकीय
योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच या योजनांच्या लाभार्थ्यांना
प्रातिनिधिक स्वरुपात लाभाचे वितरण करण्यात येईल. विविध शासकीय विभागांची दालने
याठिकाणी उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी.
पी. केस्तीकर आणि लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष एस. एम. इंगळे यांनी दिली.
*****
Comments
Post a Comment