लातूर येथे आयोजित पोलीस प्रदर्शनाचे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर, दि. ०३ : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये
भव्य पोलीस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय
महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते झाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यावेळी उपस्थित होते.
जनतेच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या पोलीस विभागाचे कामकाज नागरिकांना
समजण्यासाठी पोलीस प्रदर्शन उपयुक्त ठरेल. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस
विभाग करीत असलेल्या उपाययोजना समाजापर्यंत पोहचण्यासाठी हे प्रदर्शन महत्वाचे
असल्याचे श्रीमती रहाटकर यावेळी म्हणाल्या.
पोलीस प्रदर्शनामध्ये बिनधारी संदेश विभाग, आपत्कालीन संपर्क क्रमांक ११२,
वाहतूक नियंत्रण शाखा, बॉम्बशोधक पथक, सायबर सेल, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध
विभाग, भरोसा सेल, दामिनी पथक आदीविषयक कामकाजाची माहिती देण्यात आली आहे.
*****
Comments
Post a Comment