लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट
क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्ग्दर्षकांचा होणार गौरव !
सन २०२३-२४ मधील जिल्हा क्रीडा
पुरस्कारासाठी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लातूर दि.11 (जिमाका): जिल्ह्यातील उत्कृष्ट
क्रीडापटू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन
होवून त्यांचा गौरव व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत
जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२३-२४ या वर्षातील या
पुरस्कारासाठी जिल्ह्याती क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू यांनी १५ जानेवारी २०२५
पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले
आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 14
डिसेंबर 2022 च्या सुधारीत शासन निर्णयानुसार लातूर जिल्ह्यातून गुणवंत क्रीडापटू
(पुरुष, महिला व दिव्यांग) तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे जास्तीत जास्त चार
पुरस्कार देण्यात येतील. तसेच शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत सहभागी खेळाडूंना ज्यादाचा पुरस्कार गणल्या जाईल. यात गुणवंत खेळाडू
पुरस्कार -०३ ( १ महिला, १ पुरुष व १ दिव्यांग) तसेच १
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व १० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप राहील. या
पुरस्काराकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष वास्तव्य असणे
आवश्यक आहे.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार-
सतत १० वर्षे लातूर जिल्ह्यात क्रीडा
मार्गदर्शकाचे कार्य केलेले, तसेच गेल्या१० वर्षांत किमान वरीष्ठ गटातील राज्य व
राष्ट्रीय पदक विजेते, तसेच कनिष्ठ शालेय ग्रामीण व महिला (खेलो इंडीया) मधील
राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील, असे क्रीडा
मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. तसेच त्यांनी वयाची
३५ वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणासाठी लातूर जिल्ह्यातील
खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल.
णवंत खेळाडू पुरस्कार
(पुरुष,
महिला व दिव्यांग)-
पुरस्कार वर्षासह लगत पूर्व ५ वर्षापैकी २ वर्षे लातूर जिल्ह्याच्या मान्यता प्राप्त
खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केलेले खेळाडू गुणवंत खेळाडू
पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील. या पुरस्काराचे वर्ष 1 जुलै ते 30 जून या कालावधी मधील राहील.
अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या व
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा
मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांनी जिल्हा क्रीडा
पुरस्काराचा विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयातील क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. 9975576600) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, लातूर येथे आपला परिपूर्ण अर्ज १५ जानेवारी
२०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. उशिरा येणाऱ्या अर्जांचा विचार केला
जाणार नाही. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू यांनी अर्ज
सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 44
खेळांचा विचार केला जाईल-
धनुर्विद्या, मैदानी क्रीडा
स्पर्धा, बॅडमिंटन, बिलियर्डस ॲण्ड
स्नुकर, कॅरम, बुध्दीबळ, सायकलिंग, तलवारबाजी, गोल्फ,
जिम्नॅस्टिक्स, अश्वारोहण, लॉन टेनिस, मल्लखांब, नेमबाजी,
स्केटिंग, जलतरण (डायव्हींग वॉटरपोलो) ,
टेबल टेनिस, ट्रायथलॉन, आट्यापाट्या,
बास्केटबॉल, शरीरसौष्ठव, स्पोर्ट क्लाइंबिंग, मुष्ठीयुध्द, क्रिकेट, फुटबॉल, हॅण्डबॉल,
हॉकी, ज्युदो, कबड्डी,
कायाकिंग/कॅनोईग, खो-खो, भारोत्तोलन (पॉवरलिफ्टींग), रोईग, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, वजन
उचलणे (वेटलिफ्टींग), कुस्ती (रेसलिंग), वुशू, यॉटींग, सॉफ्टबॉल,
रग्बी, मॉडर्न पॅटॉथलॉन, बेसबॉल व स्क्वॅश या खेळांचा
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी विचार केला जाईल.
*****
Comments
Post a Comment