स्वामित्व योजनेंतर्गत मालमत्ता कार्ड, सनदचे 18 जानेवारी रोजी होणार वितरण
लातूर, दि. 15 : स्वामित्व योजनेतंर्गत देशातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्ड, सनदचे ई-वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 जानेवारी रोजी सुरु होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रतिनिधींच्या उपस्थित लातूर जिल्ह्यातही 30 गावांमध्ये सनद वितरण करण्यात येणार आहे.
पंतप्रधानानी 24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजनेचे उद्घघाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावांतील अबादी क्षेत्रातील घरांसाठी मालमत्ता पत्रक देणे हा आहे. यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्राचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि सामाजिक - आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे.
18 जानेवारी 2025 रोजी मालमत्ता कार्ड, सनद, ई-वितरण झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमानंतर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रमाद्वारे मालमत्ता कार्डांचे, सनदचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे.
स्वामित्व योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 502 गावांच्या सनद प्राप्त झालेल्या असून त्याचे लाभार्थी संख्या 69 हजार 304 आहेत. यापैकी 233 गावाचे सनद वाटप झालेले आहे. 1 ऑक्टोबर, 2024 ते 20 डिसेंबर, 2024 अखेरे पीआरसी जनरेशन झालेली 30 गावांची सनद वाटप 18 जानेवारी, 2025 रोजी करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख एन.एन. पटेल यांनी कळविले आहे.
***
Comments
Post a Comment