तालुकास्तरीय लोकशाही दिनात 30 दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात करता येईल तक्रार

 

तालुकास्तरीय लोकशाही दिनात 30 दिवसांत कार्यवाही न झाल्यास

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात करता येईल तक्रार

लातूर, दि.13 :-  जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, तालुकास्तरीय लोकशाही दिना 30 दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करता येईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी कळविले आहे.

लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने आपल्या वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक असून अर्जदार यांनी प्रथम तालुकास्तरावर तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तसेच जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

****  



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत