शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी १५ नोव्हेंबरपर्यानात ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी १५ नोव्हेंबरपर्यानात ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर (जिमाका), दि. १३: राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा अत्यंत प्रतिष्ठित समजला जाणारा 'शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी १२ ऑक्टोबर, २०२६ ते १५ नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडूंसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, साहसी उपक्रमांसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच दिव्यांग खेळाडूंकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. शासन निर्णय २९ डिसेंबर, २०२३ व २५ जानेवारी, २०२४ नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली २०२३ मध्ये विहित करण्यात आली आहे. या सुधारित नियमावलीनुसार, सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या दोन वर्षांच्या पुरस्कारांसाठी राज्यातील उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार विजेते, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू व व्यक्ती यांच्याकडून १२ ऑक्टोबर, २०२६ ते १५ नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम विजेते आणि दिव्यांग खेळाडूंनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर १२ ऑक्टोबर, २०२६ ते १५ नोव्हेंबर, २०२६ दरम्यान रात्री ११:५९ वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन स्वरूपातच आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंढे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत