Posts

Showing posts from February, 2024

देवणी येथे 4 मार्च रोजी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन

  देवणी येथे 4 मार्च रोजी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन लातूर, दि. 29 (जिमाका):  जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत देवणी येथे सोमवार, 4 मार्च 2024 रोजी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी पशुधन व कुक्कुट गटांची नोंदणी 4 मार्च रोजी प्रदर्शनस्थळी सकाळी 11 नंतर केली जाणार आहे. तसेच सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंतचा वेळ पशुधन निवडीसाठी राखीव असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे. पशुसंवर्धनामध्ये सहभागी होण्यासाठी पशुधनाचे लंपी चर्मरोगाचे रोगप्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्र व सक्षम प्राधीका-यांचे स्वस्थ दाखला प्रमाणपत्र घ्यावे. लंपी चर्म रोग किंवा इतर कोणताही रोग नसलेबाबत पशुपालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. प्रत्येक गटातील पशुधनास प्रथम ,  द्वितीय ,  तृतीय व अ ,  ब ,  क ,  ड अशाप्रकारे बक्षीस वाटप करण्यात येईल. प्रत्येक गटात दहा पशुधनाचा सहभाग बंधनकारक राहील अन्यथा तो गट होणार नाही व त्या गटातील पशुधनास ग्रेडप्रमाणे अ ,  ब ,  क ,  ड याप्रमाणे बक्षीस वाटप करण्यात येईल. सर्व सहभागी पशुपालकांना बक्षीसाची रक्कम ही संगणक प्रणाली (आर.टी.जी.एस.) द्वा

टपाल विभागाच्या महिला सन्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजनेबाबत होणार जनजागृती

  टपाल विभागाच्या महिला सन्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजनेबाबत होणार जनजागृती लातूर ,  दि. 29 (जिमाका):  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने महिला सशक्तीकरण अंतर्गत आणि महिलांचा गुंतवणूकीत सहभाग वाढविण्यासाठी  ‘ महिला सन्मान बचत पत्र ’   ( व्याजदर 7.50 टक्के) नवीन बचत योजना सर्व पोस्ट ऑफिसमार्फत सुरु केली आहे. तसेच मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी  ‘ सुकन्या समृध्दी योजना ’   ( व्याजदर 8.20 टक्के) सुरु केली आहे. या दोन्ही योजनांची जनजागृती करण्यासाठी अधीक्षक डाकघर धाराशिव विभाग ,  मुख्यालय लातूर यांच्याकडून 1 ते 8 मार्च ,  2024 या कालावधीमध्ये संपूर्ण लातूर जिल्हातंर्गत सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विशेष जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात वेळापत्रक बनवून जनजागृती मेळावे आयोजित केले आहेत. अभियानांतर्गत संपूर्ण योजनेची माहिती देणे ,  घरोघरी पोस्ट ऑफिस योजना पोहोचविणे ,  पात्र लाभार्थी यांचे तात्कार नवीन खाते उघडणे इत्यादी  सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्व महिलांनी या  योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन धाराशिव विभाग ,  मुख्याल

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 29 (जिमाका):  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ,  सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी नितीनकुमार वाघमारे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश 1 मार्च ,  2024 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 15 मार्च ,  2024 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे ,  सोटे ,  तलवारी ,  भाले ,  दंडे ,  बंदुका ,  सुरे ,  काठ्या ,  लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल ,  अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते ,  आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा ,  गाणे म्हणणे ,  वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा ,  अंत्ययात्रा ,  विवाह ,  अधिकारी ,  कर्मचारी यांना लागू राहणार

‘खेलो इंडिया’ अंतर्गत लातूर येथे मुला-मुलींसाठी कुस्ती प्रशिक्षण निवड चाचणीचे आयोजन

  ‘खेलो इंडिया’ अंतर्गत लातूर येथे मुला-मुलींसाठी कुस्ती प्रशिक्षण निवड चाचणीचे आयोजन लातूर, दि. 29 (जिमाका): भारतीय खेल प्राधिकरण व राज्य शासनाचे क्रीडा युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे 5 मार्च , 2024 रोजी खेलो इंडिया कुस्ती केंद्रामध्ये मुला-मुलींची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या खेलो इंडिया कुस्ती केंद्रात मोफत कुस्ती प्रशिक्षण देण्यात येत आहे. या निवड चाचणीद्वारे नियमित कुस्ती प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या प्रतिभा संपन्न अनिवासी कुस्ती खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे , तरी लातूरमधील कुस्तीगिरांनी या संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. या चाचणीसाठी येताना जन्मतारखेचा दाखला , दोन फोटो , रहिवासी प्रमाणपत्र , खेळाचे प्रमाणपत्र (असल्यास) सोबत आणावे. अधिक माहितीसाठी लातूरचे खेलो इंडिया कुस्ती मार्गदर्शक चेतन संभाजी जावळे (भ्रमणध्वनी क्र. 9960159798) यांच्याशी संपर्क साधावा. या चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. लकडे यांनी केले आहे. उपलब्ध सुविधा प्रशस्त मॅट हॉल , क्रीडा साहित्य

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत युवक-युवतींना मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत युवक-युवतींना मिळणार व्यवसाय प्रशिक्षण लातूर, दि. 29 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास व उद्योजकता कार्यक्रम 2024-2025 अंतर्गत युवक-युवतींना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील समाज व तत्सम 12 पोटजातीतील वय 18 ते 50 वयोगटातील लाभार्थी , विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी 15 मार्च 2024 पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण घेण्यास इच्छुकांनी अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक , साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , बी विंग , तळमजला , शिवनेरी गेटसमोर , डाल्डा फॅक्टरी, लातूर यांच्याकडे संपर्क साधावा , असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. *****

लातुरात झाली राज्यातील पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी 95 उद्योग घटकांसाठी झाले 1 हजार 340 कोटींचे सामंजस्य करार

Image
  लातुरात झाली राज्यातील पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी 95 उद्योग घटकांसाठी झाले 1 हजार 340 कोटींचे सामंजस्य करार ·         3 हजार 758 जणांना मिळणार रोजगार लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने आज लातूर येथील हॉटेल ग्रँड सरोवर येथे राज्यातील पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूकदार व व्यावसायिक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 95 उद्योग घटकांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक अविनाश कामतकर, ‘मैत्री’ कक्षाचे पद्माकर हजारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके, व्यवस्थापक गोपाळ पवार यांच्यासह उद्योजक, ब

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा लातूर, दि. 29 (जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार, 1 मार्च 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 1 मार्च रोजी दुपारी 1 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल व राखीव. दुपारी 2 वाजता हेलिकॉप्टरने उदगीरकडे प्रयाण करतील. दुपारी 2.30 वाजता उदगीर सोमनाथपूर येथील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. सायंकाळी 5 वाजता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित ‘मराठी बाणा’ कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सोयीनुसार उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील. *****

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा लातूर दौरा

 गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा लातूर दौरा लातूर, दि. 28 (जिमाका): राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे गुरुवार, 29 फेब्रुवारी, 2024 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  ना. सावे यांचे 29 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 9.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह लातूर येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोयीनुसार लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. ***

‘महासंस्कृती महोत्सव’ अंतर्गत उदगीर येथे ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे आयोजन

  ‘महासंस्कृती महोत्सव’ अंतर्गत उदगीर येथे ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे आयोजन लातूर, दि. 28 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने लातूर जिल्हास्तरावर 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान ‘महासंस्कृती महोत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांतर्गत 1 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 पासून ‘मराठी बाणा’ आणि स्थानिक कलाकारांचे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहेत. उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुल (जुनी जिल्हा परिषद शाळा मैदान) येथे आयोजित या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. महासंस्कृती महोत्सव अंतर्गत उदगीर येथे आयोजित कार्यक्रमात सायंकाळी 5 ते 6 या कालावधीत स्थानिक कलावतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 6 ते 10 पर्यंत ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन अशोक हांडे यांचे आहे. ****  

सार्वजनिक मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लिफ्ट, उतार रस्ता तयार करण्याचे आवाहन

  सार्वजनिक मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लिफ्ट, उतार रस्ता तयार करण्याचे आवाहन लातूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील विविध सार्वजनिक मंदिरे , धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लिफ्ट अथवा उतार रस्ता (रॅम्प) यांची सोय उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांग , शारिरीकदृष्ट्या अशक्त , आजारी , वयोवृध्द इत्यादी व्यक्तींनी दर्शनासाठी पायऱ्या चढून जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना सोई अभावी सार्वजनिक मंदिरे, धार्मिक स्थळे याठिकाणी ते भेटी देवू शकत नाहीत व दर्शनापासून वंचित राहतात, असे समाजातील काही हितचिंतक लोकांनी निदर्शनास आणून दिले आहे, तसेच याबाबत लातूर धर्मादाय सहआयुक्त यांनी केलेल्या पाहणीत ही बाब निदर्शनास साली आहे. तरी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लिफ्ट, उतार रस्ता तयार करण्याचे आवाहन धर्मदाय सहआयुक्त बंडोपंत कुलकर्णी यांनी केले आहे. दिव्यांग , शारिरीकदृष्ट्या अशक्त , आजारी , वयोवृध्द व्यक्तींना मंदिर व धार्मिक स्थळास भेट देण्यासाठी व दर्शनासाठी संबंधित मंदिर अथवा धार्मिक स्थळाने सोय उपलब्ध करुन दिल्यास, अशा व्यक्ती देव दर्शन व तेथे साजरा होणारे धार्मिक उत्सव या

पोस्ट ऑफिसमध्ये नवीन आधार नोंदणी आणि दुरुस्तीची सुविधा

  पोस्ट ऑफिसमध्ये नवीन आधार नोंदणी आणि दुरुस्तीची सुविधा लातूर, दि. 28 (जिमाका): धाराशिव डाक विभागातील लातूर मुख्य डाकघर कार्यालयातंर्गत 11 पोस्ट ऑफिसमध्ये नवीन आधारकार्ड व आधारकार्ड अद्ययावत (अपडेट) करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या केंद्राद्वारे नवीन आधारकार्ड तसेच आधारकार्डधारकाचे नाव , पत्ता , मोबाईल नंबर , ई-मेल आयडी , फोटो अद्ययावत करण्यात येतात. भारत सरकारच्या नवीन नियमानुसार ज्या व्यक्तींनी त्यांचे आधार 10 वर्षे किंवा त्याहून आधी काढले किंवा अपडेट केले आहे , त्यांनी आधार अपडेट करणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यात लातूरमध्ये गांधी चौक येथील प्रधान डाकघर , मुरुड पोस्ट ऑफिस , किल्लारी पोस्ट ऑफिस , अहमदपूर पोस्ट ऑफिस , देवणी पोस्ट ऑफिस , उदगीर पोस्ट ऑफिस , औराद शहाजनी पोस्ट ऑफिस , औसा ऑफिस , चाकूर पोस्ट ऑफिस , निलंगा पोस्ट ऑफिस , टिळकनगर पोस्ट ऑफिस या धाराशिव डाक विभागाच्या लातूर अंतर्गत येणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार अद्ययावत केंद्र सुरु आहेत. तरी नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा , असे आवाहन धाराशिव विभाग मुख्यालय लातूरचे डाक अधीक्षक एस. एन. अंबेकर यांनी केल

भटक्या, विमुक्तांच्या पालावर पोहचले जिल्हा प्रशासन !

Image
  भटक्या, विमुक्तांच्या पालावर पोहचले जिल्हा प्रशासन ! ·         वंचितांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पहिलाच उपक्रम ·          जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण ·          शासकीय योजनांचा लाभ मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य लातूर, दि. 28 (जिमाका) :  विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील घटकांना त्यांचा पालावर जावून शासकीय योजनांचा लाभ देण्याचा अभिनव उपक्रम आज लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आला. प्रशासनाने आपल्या दारात येवून शासकीय योजनांचा लाभ दिल्याने महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील बुऱ्हानगर येथील पालावरील भटक्या विमुक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जवळपास 90 व्यक्तींना विविध लाभांचे वितरण करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, भटके विमुक्त विकास परिषदेचे नरसिंह झरे ,  राहुल चव्हाण यावेळी उपस्थि