मधकेंद्र योजना जनजागृतीसाठी आज जनजागृती मेळावा


लातूर, दि. 26 :  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिला युवक-युवती, सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था, बचतगट, स्वयंसहाय्यता युवागट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, पारंपारिक कारागीर इत्यादी समाजातील सर्वच घटकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी आज, 27 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत लातूर तालुक्यातील मौजे चांडेश्वर येथे जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो. मधकेंद्र योजनेंतर्गत लाभ घेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था महामंडळामार्फत करण्यात येते. त्यानुसार 27 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालायानाचा सहभाग राहणार आहे. तसेच मेळाव्याला उपस्थित इच्छुकांकडून नाव नोंदणी अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तरी या जनजागृती मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु