क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम


लातूर, दि.15,(जिमाका) :   राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार, 16 फेब्रुवारी, 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 16 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान येथे राखीव. सकाळी 10 वाजता ते लातूर येथून मोटारीने जळकोटकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता जळकोट येथील बसस्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्या ते उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता जळकोट येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता उदगीर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.30 वाजता उदगीर तालुक्यातील भाकसखेडा (पश्चिम) येथे संजय बापूराव पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 4.30 वाजता उदगीर येथील एस.टी. कॉलनी येथे प्रा. दिलीप मटके यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सांयकाळी 5 वाजता उदगीर शहरातील क्रांती नगर बनशेळकी रोड येथे अजमत पठाण यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतीलसायंकाळी 5.30 उदगीर शहरातील बिदर रोडवरील छत्रपती शाहू महाराज चौक येथे ॲङ हिसामोद्दीन खतीब यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सांयकाळी 6.05 उदगीर नगर परिषद प्रांगण येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्त शाहीरी पोवाडे, लोकनृत्य, लोकगीत, देशभक्ती गीत, शेतकरी नृत्य कार्यक्रमास उपस्थित राहतील. सांयकाळी 6.30 वाजता उदगीर येथील विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठवाड्यातील पहिले महिला शिवशाहीर पथक डॉ. निशिगंधा साळुंखे यांच्या महिला शिवशाहीर पोवाडा समारंभास उपस्थित राहतीलसायंकाळी 7 वाजता उदगीर शहरातील जळकोट रोडवरील ग्रँन्ड फंक्शन हॉल येथे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू ॲन्ड सेमी इंग्रजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंम्मलेन कार्यक्रमास उपस्थित राहतील व सोईनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील. लातूर येथील शकुंतला निवासस्थान येथे आगमन व राखीव.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु