अहमदपूर उपविभागातील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

 अहमदपूर उपविभागातील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा



लातूर, दि. 26 :  आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत आज अहमदपूर तहसील कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी अहमदपूर महसूल उपविभागात निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.


प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत कदम, अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार शिवाजी पालेपाड, नायब तहसीलदार पंकज मांदाडे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


प्रत्येक पात्र व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक असून नवीन मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावे. तसेच मतदार यादीमध्ये असलेल्या दिव्यांग मतदार चिन्हांकित कराव्यात. जेणेकरून त्यांना मतदानासाठी घेवून येणे शक्य होईल. तसेच उपविभागात भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सखी मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्याबाबत नियोजन करावे. भरारी पथके आणि इतर पथके स्थापन करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. टपाल मतपत्रिका, वाहतूक आराखडा, भरारी पथके, स्थायी पथके, चेक पोस्ट आदी अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु