दिशा अभियानातंर्गत शैक्षणिक अध्यापनाचा आढावा

 

दिशा अभियानातंर्गत शैक्षणिक अध्यापनाचा आढावा

 

लातूर,दि.26(जिमाका): दिशा अभियानातंर्गत बौध्दिक असक्षम ‍विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्यापनाचा विकास आढावा घेत या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य मुलांत समावेश करणे, स्वावलंबी बनविणे तसेच स्वत:ची कर्तव्ये स्वत: पार पाडणे यासह अनेक बाबींवर जिल्हा समाज कल्याण कार्यालयातंर्गत‍ घेण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

लेबर कॉलनी येथील शासकीय अंध शाळेत जिल्ह्यातील दिव्यांग शाळांतील मुख्याध्यापक, अधीक्षक यांची आढावा बैठक नुकतीच जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाडा, सहाय्यक सल्लगार बाळासाहेब वाकडे यांची उपस्थिती होती.

या बैठकीत शाळांचे नूतनीकरण, वेतनेत्तर अनुदान, कर्मचार थकीत वेतन, सातवा वेतन आयोगय अनुकंपा नियुक्ती प्रस्ताव, रिक्त पदे, दिशा अभियान, सेवानिवृत्त तथामयत कर्मचाऱ्यांचा सातावा वेतन आयोगाचे देय फरक, कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्यावत करणे, सरल प्रणाली, परीक्षा वेळापत्रक व नियोजन, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा याबाबत शाळानिहाय आढावा घेण्यात आला.

 याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्ह्यातील 52 दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शासकीय अंध शाळेतील कर्मचारी तसेच समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दिव्यांग शाळेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव

जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याचे प्रथमच नियोजन जिल्हा समाज कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले होते. या अंतर्गत क्रीडा शिक्षक उदय गोजमगुंडे, विशेष शिक्षक मनोजकुमार खंडेलवाल, संजय कुलकर्णी यांचा गौरव जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आला. यासह सिकंदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय मेळाव्यात उदगीरच्या जीवन विकास निवासी गतिमंद कर्मशाळेच्या विद्यार्थांनी राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल अधिीक्षक राजा पोल यांचाही सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु