अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

            अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी

ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि. 2 (जिमाका): अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विकास व्हावायासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक योजना सन 2023-24 अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ठिबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज करुन लाभ घेण्याचे आवाहन लातूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे.

अल्प व अत्यल्प भूधारक तसेच बहुभूधारक क्षेत्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक योजना सन 2023-24 अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक (2 हेक्टरपर्यंत क्षेत्र) शेतकऱ्यांना 55 टक्के तर बिरसा मुंडा कृषि क्रांती स्वावलंबी योजना तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेंतर्गत 35 टक्के असे एकूण 90 टक्के तर बहूभूधारक (2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र) शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 45 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान असणारी लाभदायी योजना आहे. ठिबक व तुषार घटकामुळे उत्पादनात व उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आर्थिकस्तर उंचावण्यात मदत होईल. तसेच पाण्याचा काटेकोर वापर झाल्याने तणांची वाढ रोखण्यास मदत होते आणि सिंचन क्षेत्रात वाढ होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन लातूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. लाडके यांनी केले आहे.

*****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु