जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे गुरुवारपासून आयोजन · जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे गुरुवारपासून आयोजन

·         जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

लातूर, दि. 5 (जिमाका): कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने 8 ते 10 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) परिसर येथे लातूर जिल्हास्तरीय कृषि महोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि महोत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

 

शेतकऱ्यांना आपापसातील विचारांची देवाणघेवण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वध्दिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम हावून जागतिक पातळीवर स्पर्धात्मक वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील. कृषि महोत्सवामध्ये कृषि यांत्रिकीकरण, खते, किटकनाशके, सिंचनाचे साधने, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती कृषी क्षेत्रातील नाविण्यपूर्ण बाबी इत्यादीबाबत जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी यांना याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया , पशुपालन, कृषि यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती अशा विविध विषयावर चर्चासत्र आणि परिसंवाद, तसेच शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान या महोत्सवात केला जाणार आहे. यामध्ये 200 स्टॉलच्या माध्यमातून कृषि व गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि उत्पादक ते ग्राहक दालनाच्या माध्यमातून माफक दरात थेट खरेदी व विक्री करता येणार आहे. कृषि विभागामार्फत कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विद्यपीठाचे स्टॉल, विविध कृषिनिगडीत साहित्याचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चर्चासत्राचे आयोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवास विविध मान्यवरांच्या भेटी होणार आहेत. 8 फेब्रुवारी रोजी कृषि महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, 10 फेब्रुवारी, 2024 रोजी कृषि महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण होईल.

जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला गटांनी सहभागी या महोत्सवात सहभागी होवून संधीचा लाभ घ्यावा. हा कृषि महोत्सव ज्ञान व तंत्रज्ञान माहिती देणारा आणि कृषि क्षेत्राच्या प्रगतीला चालना देणार ठरणार आहे. सर्वांनी कृषि महोत्वाला भेट देवून लातूर जिल्ह्याच्या कृषि विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी कृषि विभागाच्यावतीने केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु