संशयित क्षयरुग्णांची तपासणी करून योग्य उपचार करावेत - अनमोल सागर


 संशयित क्षयरुग्णांची तपासणी करून योग्य उपचार करावेत

-         अनमोल सागर

लातूरदि. 2 (जिमाका): संशयित क्षयरुग्णांची तपासणी करुननिदान करून अशा रुग्णांवर लवकरात लवकर योग्य उपचार सुरु करावेत. अखंडित उपचारातून त्यांना क्षयमुक्त करण्यासाठी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र येथे समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या क्षमता वृद्धीकरण प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. सागर बोलत होते. 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

उपचार सुरु असलेल्या क्षयरुग्णांची आवश्यक काळजी घेवून, अशा रुग्णांनी संपूर्ण उपचार घेतल्याची खात्री करावी. जिल्ह्यातील सर्व क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील दानशूर संस्थादानशून व्यक्तीप्रतिष्ठीत नागरीकलोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने गरजू क्षयरुग्णांना सकस व पौष्टीक आहार मिळावा, यासाठी त्यांना क्षयरोग मुक्त भारत अभियानामध्ये सहभागी करून घ्यावे. तसेच या अभियानात लातूर जिल्हा अग्रेसर राहील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. सागर यांनी यावेळी केले.

कार्यक्षेत्रातील सर्व क्षयरुग्णांची गृहभेटी देण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांना दिल्या. त्यामुळे क्षयरुग्ण हा औषधोपचारापासून वंचित  राहणार नाही व उपचारात खंड पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

फुफ्फुसाच्या क्षयरुग्णांच्या सानिध्यातील पाच वर्षावरील सर्व नातेवाईकांची इग्रा टेस्ट करुन घ्यावी. तसेच त्यांना क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार देण्यात यावा, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांनी सांगितले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. सम्यक खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधवविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिजित यादव, डॉ. मनोज कदमडॉ. हर्षवर्धन राऊतडॉ. डी. के. रुपनर यांनी मार्गदर्शन केले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु